Working Women : खरोखर महिला आणि पुरुषांमध्ये कामाच्या बाबतीत समानता आहे का?

Working Women : आपण असं म्हणतो कि महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालत आहेत. हर एक क्षेत्रामध्ये आज महिला पुढे पाऊल टाकण्यात यशस्वी ठरत आहेत. जुन्या काळाचा विचार केला तर आता हि झालेली प्रगती खरोखर प्रशंसनीय म्हणावी लागेल. पण याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे कामाच्या ठिकाणांहून महिलांच्या संख्येत झालेली घट. आजच्या घडीला अनेक कर्मचारी आपल्या नोकऱ्या गमावत आहेत आणि सोबतच महागाईने धरलेला जोर काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अश्या गंभीर परिस्थतीत आता महिलांच्या संखेत झालेली हि घट अजून एक धोक्याची घंटा आहे का यावर विचार करावा लागणार आहे.

महिलांच्या संख्येत झाली घट: Working Women

खास करून मॅनेजर पदावर असलेल्या महिलांच्या संख्येत होणाऱ्या घटीमुळे देशाची चिंता वाढली आहे. पॅरिस-आधारित ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार समोर आलेली माहिती सांगते की पुरुषांच्या तुलनेत देशातील मॅनेजर पदावर असलेल्या महिलांची संख्या 20% पेक्षा कमी आहे. कोविडनंतर हा आकडा बदलल्याची शक्यता आहे. कारण वर्ष 2019 पर्यंत जो आकडा 16.9 टक्क्यांवर होता त्यात आता घसरण होऊन नवीन आकडा 15.9 झाला आहे. जर का आपण जगाच्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थती तपासून पहिली तर आपला आकडा खरोखरच बिकट आहे.

भारतीय महिला या अजूनही मागे:

आपण कितीही म्हटलं कि महिला आणि पुरुष एक समान काम करत आहेत तरीही खरा आकडा आपल्याला जाणीव करून देईल कि हा विचार कसा आणि किती चुकीचा आहे. भारतीय महिला कमाईच्या बाबती अजूनही पुरुषांपेक्षा मागे आहेत. जगभरातील महिला पुरुषांपेक्षा कमी पैसे कमावतात पण आपल्या भारतात आजही हा आकडा दयनीय आहे. हि परिस्थती एवढी बिकट आहे कि जर एखाद्या पुरुषाने 100 रुपये कमावले तर त्याच्या तोडीची महिला फक्त 22.8 रुपये कमावते. हि परिस्थिती खरोखर गंभीर असल्यामुळे याबद्दल वेळेत विचार होणं गरजेचं आहे.