Workplace Humiliation Post: वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येकालाच घराबाहेर पडत काही ना काही काम करण्याची गरज वाटते. या महागाईच्या दुनियेत टिकाव लागायचा असेल तर दर महिन्याला एक ठराविक रक्कम ही खर्चासाठी घरात आलीच पाहिजे. कित्येकदा लोकं घर खर्च भागवण्यासाठी हातात येईल ते काम स्वीकारायला तयार होतात. देशात शिक्षित तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे अनेकांच्या हाती शिक्षणाला साजेल असं काम लागत नाही. नोकरीच्या क्षेत्रात सध्या एक प्रकारची स्पर्धाच सुरू आहे असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी कंपनीकडून बनवण्यात येणारे नियम हे कंपनी तसेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बनवलेले असतात. मात्र काही ठिकाणी हेच नियम कर्मचाऱ्यांसाठी कष्टकरी बनत चालले आहेत. अलीकडेच एका कर्मचारी महिलेने कामाच्या ठिकाणी तिच्या सोबत झालेल्या एका वाईट प्रसंगाचे वर्णन केले आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर अनेक नेटकरी तिचे समर्थन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात, कित्येकांनी कमेंट्स मधून या महिलेला पाठिंबा दिला आहे.
कंपनीच्या मालकाने केली विचित्र मागणी:(Workplace Humiliation Post)
रेडीट या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करत एका कर्मचारी महिलेने तिच्यासोबत कंपनीमध्ये झालेल्या गैरवर्तवणुकीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती महिला म्हणते की कामाचा व्याप सांभाळण्यासाठी तिने काही वेळा दुपारच जेवण सुद्धा केलेलं नाही, तसेच कंपनीची मागणी पूर्ण करण्यासाठी तिने तासंतास एकाच जागी बसून कामाचा व्याप पूर्ण केला आहे. यानंतर पुढे तिने वर्णन केलेल्या एका प्रसंगाने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ही कर्मचारी महिला म्हणते की आठ मिनिटांसाठी घेतलेल्या वॉशरूम ब्रेक मुळे तिला कंपनीकडून एकतर सिक लिव्ह घ्या किंवा लवकरात लवकर कामावर परत रुजू व्हा अशा संदेश पाठवण्यात आला होता. कंपनीमध्ये घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे अनेकांनी पीडित महिलेचे समर्थन केले आहे(Workplace Humiliation Post).
कंपनीत घडलेल्या या घृणास्पद प्रकाराला सोशल मीडियावर अनेक जणांनी हिणवलं आहे. तसेच नेटकरी महिलेच्या बाजूने उभे राहत तिला सहानभूती देत आहेत. काही लोकांच्या मते अशा कंपन्याविरुद्ध त्वरित कारवाई केली गेली पाहिजे. तर काही जणांनी न घाबरता कर्मचाऱ्यांनी आपल्या सुट्ट्यांचा बिनघोर वापर करावा असं सल्ला दिला आहे. कंपनीमध्ये झालेल्या या प्रकारानंतर काही नेटकरी कंपनीची खिल्ली उडवत म्हणतात की आता लवकरच कंपन्यांकडून बाथरूम पॉलिसी देखील तयार करण्यात आली पाहिजे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काय म्हणते महिला?
सोशल मीडिया हे आत्ताच्या जगात सर्वात उपयुक्त असं माध्यम समजलं जातंय. जगभरातील अनेक माणसं आपल्या वेदना, सुखदुःख सोशल मीडियाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवत असतात. सध्या चर्चेत असलेल्या या कर्मचारी महिलेने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की केवळ आठ मिनिटांसाठी घेतलेल्या वॉशरूम ब्रेक वर कंपनीने त्वरित कारवाई केली. ही महिला म्हणते की आतापर्यंत तिने अहोरात्र कंपनीसाठी काम केलेलं आहे, अनेक वेळा ब्रेक न घेता तसेच शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर देखील तिने कंपनीसाठी वेळ खर्च केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीचा हा कृतघ्न व्यवहार(Workplace Humiliation Post) तिच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचा आणि निंदनीय आहे.
ती म्हणते की सुरुवातीलाच कंपनीच्या अशा गैरवर्तवणुकीवर तिने आवाज उठवायला पाहिजे होता. रिटेल क्षेत्रात काम करणारी ही महिला म्हणते तिथे येणारे ग्राहक हे अनेक वेळा कर्मचाऱ्यांशी नीट वागत नाहीत तसेच या क्षेत्रात काम करणारे उच्च पदावरील कर्मचारी वाईट भाषेचा वापर करत इतरांशी संवाद साधतात. इथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा कमी दर्जाची कामं दिली जातात आणि त्यानुसार त्यांना मिळणारा पगार देखील हलकाच असतो. या सर्व परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे सध्या ही महिला त्वरित दुसरे नोकरी शोधण्याचा मार्गावर आहे.