World Bank On Indian Economy । जागतिक बँक म्हणजेच World Bank कडून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक बँकेने वर्ष 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा ठरला तर येणारा काळ हा आर्थिक दृष्ट्या आपल्यासाठी आनंदाचा असेल. देशातील गुंतवणूक व देशांतर्गत मागणीच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत जोमाने प्रगती करत आहे. सर्व बाजूंनी सक्षम बनत जगात नाव मिळवण्याचा व ते नाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अश्यातच समोर आलेली हि बातमी आपले मनोबल वाढवणारी ठरणार आहे.
World Bank चा असा आहे अंदाज:
भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होईल असा अंदाज जागतिक बँककडून एका अहवालातून (World Bank On Indian Economy) सादर करण्यात आला. आजूबाजूला आव्हानात्मक वातावरण असताना देखील भारताकडून केलेली हि कामगिरी प्रशंसनीय असणार आहे. भारत देशाच्या विकासात सातत्य आहे, व हीच देशाची सर्वात मोठी ताकद म्हणावी लागेल. आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थित या देशात पुढच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत 6.3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बँकेच्या इंडिया डेव्हलपमेंट अपडेट 2023 (World Bank) मध्ये असे नमूद केले आहे कि भारत हि गेल्यावर्षी सातत्याने आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. आजूबाजूच्या सर्व आव्हानांशी दोन हात करत भारताने आपली वाटचाल कायम ठेवली व आपल्या अर्थव्यवस्थेत 7.2 टक्क्यांची वाढ नोंदवली होती.
एकंदरीत असा होता अहवाल: World Bank On Indian Economy
जागतिक बँकेच्या अहवालातील (World Bank On Indian Economy) सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतात वर्ष 2024 मध्ये होणारी आर्थिक वाढ आहे. याशिवाय ते असेही म्हणाले कि हल्लीच भारतात झालेल्या G20 चर्चेत सर्व देशांमध्ये आपल्या भारताचा विकास दर हा दुसऱ्या क्रमांकावर होता. देशाचा बँक क्रेडीट स्कोर हा Q1FY23 मध्ये 13.3 टक्के होता जो आता वाढून Q1FY24 मध्ये 15.8 टक्के झाला आहे. याशिवाय सेवा क्षेत्रांमध्ये 7.4 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे, गुंतवणूकीचा दर मात्र 8.9 टक्केच कायम राहील असा अंदाज लावण्यात आला आहे.
भारताव्यतिरिक्त इतर देशांबद्दल जागतिक बँकेने काही अंदाज लावले आहेत, ज्यात आर्थिक वर्ष 2024 मध्ये पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत 1.7 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. मालदीवमध्ये 6.5 टक्के, नेपाळमध्ये 3.9 टक्के, बांगलादेशमध्ये 5.6 टक्के तर एक वाईट काळ सहन करू सुद्धा श्रीलंकेत 1.7 टक्के वाढ होणं अपेक्षित आहे. एकंदरीतच दक्षिण आशियात वर्ष 2024 मध्ये 5.6 टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, आणि हा आकडा इतर कोणत्याही विकासशील प्रदेशापेक्षा मोठा ठरणार आहे. मात्र विकासात येणाऱ्या अनेक समस्या व चीनमधली वाढणारी मंदी याचा वाईट परिणाम प्रदेशावर होऊ शकतो असेही हा अहवाल (World Bank) कबुल करतो.