बिझनेसनामा ऑनलाईन । 5 ऑक्टोबर पासून भारतात 50 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात झाली असून संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या वर्ल्डकप दरम्यान जाहिरातींमधून होणारे उत्पन्न 2,000 कोटी रुपयांच्या घरात किंवा त्याहूनही जास्ती असण्याची शक्यता आहे. हा काळ दिवाळी दसऱ्याचा असल्यामुळे जाहिरातींच्या खर्चात 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आता सुरु झालेल्या क्रिकेटच्या सामन्यांमुळे जाहिरातदारांची (Advertisements) उत्सुकता वाढली आहे. तसेच 2019 च्या तुलनेत यंदा जाहिरातींवर होणारा खर्च दुप्पट असणार आहे.
जाहिरातींवर होणार भरपूर खर्च: World Cup 2023
भारतात क्रिकेट हा कोणत्याही धर्मापेक्षा कमी नाही. लाख आणि कोटींच्या घरांत लोकं क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेतात. त्यातच वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळाच…. त्यामुळे हा काळ कंपनिंसाठी उत्पादनांचे मार्केटिंग करण्यास योग्य आहे, कारण बहुसंखेत म्हणजे जवळपास 1.4 अब्ज लोकं यावेळी स्क्रीनच्या समोर बसलेले असतात. सर्व ब्रेन्डीन्ग प्लेटफॉर्मवर स्लॉट मिळवण्यासाठी कंपन्या 240 दशलक्ष डॉलर्सपर्यंत (अंदाजे 2,000 कोटी) खर्च करतात.आश्चर्याची बाब म्हणजे सामन्याच्या वेळी प्रसिद्ध होणाऱ्या 10 सेकंदांच्या स्लॉटसाठी 30 लाख रुपये खर्च करावे लागतात. गेल्या विश्व चषकाच्या तुलनेत यंदा हा खर्च वाढला असून हि वाढ कमी नसून तब्बल 40 टक्के अधिक आहे. दरवर्षी कंपन्यांकडून 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्ती खर्च जाहिरातींवर केला जातो.
कोणत्या कंपन्यांचा यात समावेश?
विश्व चषकाच्या वेळी (World Cup 2023) जाहिरातींवर भलामोठा खर्च करणाऱ्या कंपन्यांमध्ये कोका कोला, गुगल पे, सौदी आरमाको, निसान मोटार, हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तज्ञांच्या मते लावले गेलेले हे अंदाज कितपत खरे ठरतील हे पाहणं मजेदार ठरणार आहे. भारत या विश्वचषकाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेऊन आहे, कारण भारताजवळ यंदाचे यजमानपद आहे. हे पद सांभाळताना भारत विश्व विजेता ठरतो कि नाही अशी उत्सुकता सर्वांनाच लागून आहे, मागे झालेला आशिया चषक पटकावल्यामुळे भारतीय संघाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.