World Cup 2023: काही महिन्यांपासून देशात क्रिकेट विश्वचषकाची चर्चा जोरदार सुरु आहे. आत्यापर्यंत तरी भारतीय संघ आपल्या चाहत्यांच्या मनासारखी खेळी करून त्यांना खुश ठेवण्यात यशस्वी ठरत आहे, आणि येणाऱ्या सामन्यांध्ये अशीच खेळी करत ते विश्व चषक भारतात घेऊन येतील हि आशा आता अजून पक्की होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दमदार खेळी पाहायला मिळाली, भारताने वीस वर्षानंतर एक नवीन पराक्रम रचला, मात्र दरम्यान ठरलेला हा एकाच पराक्रम नसून भारतात अजून एक पराक्रम घडला आहे, तो कोणता हे पाहूयात…
भारताने केला नवीन पराक्रम: ICC World Cup 2023
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रंजक होताच पण याच वेळी Disney+Hotstar या स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवरून 4.3 कोटी क्रिकेट प्रेमींनी खेळाचा आनंद घेतला. या नवीन रुजू झालेल्या आकड्याने विश्वातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू मेसीच्या अर्जेन्टिना विरुद्ध फ्रांस या अंतिम लढतीला मागे टाकले आहे. वर्ष 2022 मध्ये कतार येथे फिफा फुटबॉलचे विश्वचषक आयोजित करण्यात आले होते, आणि यावेळी जिओ सिनेमाकडून प्रेक्षकांसाठी याचे थेटप्रक्षेपण करण्यात आले.
उत्सुकतेने पार केला 4.3 कोटींचा आकडा:
याच सामन्यात रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा रेकोर्ड तोडू शकतो का हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक होता, अगदी शेवटच्या काही बॉलांपर्यंत खेळ नक्कीच गेला पण 95 वर खेळत असताना कोहलीने आपली विकेट गमावली आणि सोबतच करोडोंचा प्रेक्षकवर्ग निराश झाला.
पण यामुळे Disney+Hotstarच्या विवरशिपवर काही परिणाम झालेला दिसून आला नाही, उलट तेवढ्याच उत्सुकतेने लोकं रवींद्र जाडेजाच्या शेवटच्या चौकाराची वाट पाहत होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळ हा काही महामुकाबल्याशिवाय कमी नाही, त्यावेळी Disney+Hotstarला 3.5 कोटी विवरशिप मिळाली होती आणि आता या सामन्याच्यावेळी तोच आकडा वाढून 4.3 म्हणजेच 43 मिलियनवर पोहोचला होता. भारताची चालेली उत्तम खेळी पाहता या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.