बिझनेसनामा ऑनलाईन । नुकतंच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकच्या अंतिम सामन्यात (World Cup Final) ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत आपणच वर्ल्डकप जिंकणार असा विश्वास कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांना होता, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून भारताचा पराभव केला आणि सर्वांचेच स्वप्न तुटलं. परंतु एकीकडे भारत हरला असला तरी Hotstar ने मात्र मोठा विक्रम केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना 5.9 प्रेक्षकांनी Hotstar वर ऑनलाईन पद्धतीने बघितला आहे.
World Cup Final च्या दिवशी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडीयम हे भारतीय संघाच्या चाहत्यांनी पूर्णपणे भरून गेलं होतं. नजर जाईल तिथपर्यंत केवळ निळा रंग दिसायचा, पण तुम्हाला माहिती आहे का Disney+Hotstarचा वापर करून एकूण 5.9 क्रिकेट चाहत्यांनी खेळाचा थरार अनुभवला आहे. आणि या मोठ्या आकडेवारीने OTT प्लॅटफॉर्मने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया सहाव्यावेळा विश्व विजेतासंघ बनली तर भारतीय खेळाडू आणि चाहत्यांच्या वाटेला निराशा आली. तरीही आपल्या संघाने कोणतीही कसर न सोडता सलग 10 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे हे विसरून चालणार नाही.
सामना सुरु झाला तेव्हा Disney+Hotstarवर खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 5.5 कोटी होती. आपण ऑस्ट्रेलिया समोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आणि समोरचा संघ मैदानात उतरला आणि आपण पॉवरप्लेदरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या इथून प्रेक्षकांची संख्या अधिकाधिक वाढायला सुरुवात झाली.
विश्व चषकात Disney+Hotstar चा नवीन विक्रम: World Cup Final
Disney+Hotstar इंडियाचे प्रमुख सजिथ शिवनंदन यांच्या म्हण्यानुसार Disney+Hotstar वर 5.9 कोटी प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला, ज्याने सर्व रेकॉर्ड तोडले. भारतीय क्रिकेट प्रेमींनी एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. याआधी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीत लढत झाली ज्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले त्यावेळी Disney+Hotstarला 4.3 कोटींचा प्रेक्षकवर्ग मिळाला होता. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना हा दरवेळीच रोमांचक आणि दर्जेतदार असतो त्यामुळे या सामन्यात सुद्धा Disney+Hotstarने 3.5 कोटी प्रेक्षकांचा आकडा गाठला होता.