आज सर्व भारतीयांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे, कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्व विजेता संघ बनण्यासाठी शेवटचा संघर्ष केला जाईल. यंदा भारत या विश्व चषकाचे यजमानपद सांभाळत आहे आणि म्हणूच आपण विजेते होत जगावर राज्य करू का अशी भीती आणि काळजी सर्वच्या मनात लागून राहिली आहे.अनेक क्रिकेटचे चाहते आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी अहमदाबादला पोहोचलेले आहेत. पण जी लोकं घर बसल्या आजच्या या थरारक खेळाचा आनंद लुटणार आहेत त्यांनी हि बातमी नक्कीच वाचावी, कारण विचार करा शेवटच्या ओव्हर मध्ये आपला संघ जिंकत असताना तुमचा डेटा संपला आणि खेळ थांबला तर?(World Cup Final) किती मोठी संधी वाया जाऊ शकते याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला भन्नाट कल्पना सुचवणार आहोत जेणेकरून हा महत्वाचा क्षण तुम्ही घालवून बसणार नाही, कारण It Takes One Day!!
आता नेट संपलं तरीही काळजी करू नका: (World Cup Final)
आजचा दिवस हा फक्त क्रिकेटप्रेमींसाठी खास नाही तर सर्व देशवासीयांची उत्कंठा ताणून ठेवणारा आहे. जे टीव्हीवर खेळ बघणार आहेत त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही तसेच ज्यांच्या घरात वायफायचे कनेक्शन आहे ते देखील अगदीच सहजपणे खेळाची मजा घेऊ शकतात. पण जर का तुम्ही दर दिवशी 1.5 किंवा 2 GB मोबाईल डेटाचा वापर करत असाल तर मात्र ऐन वेळेला डेटा संपून तुम्ही ऐतिहासिक क्षणाला मुकु शकता कारण हा डेटा वापरून तुम्ही सर्वात लो क्वालिटी सेटिंगवर मॅच पाहण्याचा विचार केलात, तरीही डेटा संपूर्ण मॅच पाहण्यासाठी पुरेसा नाही.
त्यामुळे जर का तुम्ही एअरटेलचे वापरकर्ते असाल तर तुम्ही 118 रुपयांचा 12 GB डेटा देणारा बूस्टर पॅक वापरू शकता. याशिवाय एअरटेलने काही वर्ल्डकप पॅक्स बाजारात आणल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना खेळाचा बिनघोर आनंद घेता येणार आहे, यात 99 रुपयांचा एक अनलिमिटेड डेटा पॅक उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला इंटरनेट अनलिमिटेड मिळेल आणि याची वैधता दोन दिवस असणार आहे(World Cup Final).
जिओ आणि VIचे ग्राहक डेटा एडऑन पॅकचा वापर करू शकतात. जिओच्या 12 GB डेटा पॅकची किंमत 121 रुपये आहे जो कि तुमचा चालू पॅक संपेपर्यंत वैध असेल आणि VI कंपनीचा 12GB डेटा पॅक हा 118 रुपयांना आहे ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवस असणार आहे.