World Economy Prediction : यंदाचे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक; 56 टक्के अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केला अंदाज

World Economy Prediction : जगभरातील काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या वर्षी वैश्विक अर्थव्यवस्था अनेक संकटांचा सामना करू शकते. जवळपास 56 टक्के अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या वर्षी वैश्विक अर्थव्यवस्थेत कमजोरी आलेली पाहायला मिळू शकते, मात्र यामध्ये काही अर्थशास्त्रज्ञ असेही आहेत ज्यांना जगभरातील अर्थव्यवस्था सुधारण्याचा तसेच सकारात्मकतेने प्रगती करण्याचा अंदाज वर्तवला आहे. डावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम(World Economic Forum) मध्ये वैश्विक अर्थव्यवस्थेबद्दल चीफ इकॉनोमिक आऊटलूक रिपोर्ट(Chief Economic Outlook Report) तयार करण्यात आला. या संपूर्ण अहवालाच्या आधारे जगभरातील अधिकाधिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला संकटांचा सामना करावा लागणार आहे, अनेक जणांनी हे गंभीर मत व्यक्त केल्यानंतरही अगदी किंचित म्हणजे 7 अर्थशास्त्रज्ञांनी जगभरात अर्थव्यवस्थेतील कोणतेही बदल दिसून येणार नाहीत किंवा ती सकारात्मक प्रगती करेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आहे का? (World Economy Prediction)

जगभरातील अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते यंदाचे वर्ष हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते. उच्च चलनवाढीची शक्यता दिसत नसली तरी, प्रत्येक क्षेत्राच्या विकासाचा दृष्टीकोन वेगळा आहे आणि 2024 मध्ये असा कोणताही प्रदेश नाही जिथे मजबूत आर्थिक विकासाची शक्यता दिसून येते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक सादिया जाहिदी म्हणाल्या की, चीफ इकॉनॉमिस्टचे आउटलुक सध्याच्या अनिश्चित स्वरूपाच्या आर्थिक परिस्थितीकडे निर्देश करतात. त्या पुढे सांगतात की, वाढत्या मतभेदांदरम्यान येत्या काही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेची चाचणी घेतली जाणार आहे(World Economy Prediction). जगभर महागाई कमी होत असूनही विकासाची गती खुंटली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत तंग आहे तसेच जागतिक संघर्ष आणि विषमताही वाढत आहे. अशा परिस्थितीत, शाश्वत, सर्वसमावेशक विकासाला गती देणाऱ्या जागतिक सहकार्याची नितांत गरज वाटते.