World’s Best Companies 2023 | जगातील सर्वोत्तम 100 कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जागतिक दर्जाचे मानले जाणारे मासिक ‘टाईम्स’ मधून ही यादी जाहीर झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या 100 कंपन्यांमध्ये भारताच्या एकमेव कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी दुसरी – तिसरी कोणती नसून इन्फोसिस (Infosys) आहे. जगातील एकूण ७५० कंपन्यांध्ये इन्फोसिसने ६४ वा नंबर पटकावला आहे. या कंपनीजवळ सध्या तीन लाखांपेक्षा अधिक कर्मचारी असून,भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी बनली आहे.
कोणती कंपनी आहे नंबर 1 ? World’s Best Companies 2023
टाइम्सच्या अहवालानुसार पहिल्या चार कंपन्यांमध्ये माय्क्रोसोफ्ट(Microsoft), एपल (Apple), अल्फाबेट(Alphabet) आणि मेटा (Meta) या कंपन्यांचा समावेश आहे. जगातील टॉप 100 कंपन्यांची यादी बनवण्यासाठी (World’s Best Companies 2023) सर्व कंपन्यांचा मागील तीन वर्षांचा डेटा वापरण्यात आला आहे. ज्या कंपन्यांची कमाई वन हंड्रेड मिलिअन डॉलर्सपेक्षा जास्ती आहे, त्यांनाच या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. याच बरोबर यादीत नाव असलेल्या कंपन्यांनी वर्ष 2022 व 2023 मध्ये सकारात्मक वाढ दर्शवली आहे.
इन्फोसिस सोडून इतर कोणत्या कंपन्या आहेत यादीचा भाग?
इन्फोसिस शिवाय भारतातील इतर सात कंपन्या या यादीचा (World’s Best Companies 2023) भाग आहेत. या सर्व कंपन्यांनी 750 कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. यादीत विप्रो (Wipro) हि IT कंपनी 174 स्थानावर आहे. तर महिंद्रा ग्रुप्सने ( Mahindra Groups) 210व स्थान मिळवलं आहे तरमुकेश अंबानी यांची रिलायंस इंड्सट्रीज ( Reliance Industries) 348 व्या स्थानावर आहेत. यांव्यतिरिक्त या यादीत HCL Technologies (262) , HDFC बँक (418) , WNS ग्लोबल सर्विसीस (596) आणि ITC ला 672वे स्थान मिळालं आहे.