WTF Funds : निखिल कामथ यांनी सुरु केलाय हा फंड; 22 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजकांना 40 लाखांची मदत

WTF Funds । आपल्या देशात सर्वाधिक ग्राहक असलेली ब्रोकरेज कंपनी म्हणजे झीरोदा (Zerodha) या कंपनीचे संस्थापक निखील कामथ (Nikhil Kamath) यांनी तरुण उद्योजकांना मदत करण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. तरुण उद्योजकांना निधी उभारण्यात मदत व्हावी म्हणू त्यांनी WTF फंडची सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांना अनंत नारायण, राज शामानी आणि किशोर बियाणी यांची मदत होणार आहे. या चौघांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरु केला आहे. नेमका काय आहे हा उपक्रम, तो कसा तरुण उद्योजकांच्या फायद्याचा आहे आणि यासाठी लागणारी पात्रता काय असेल हे सर्व जाणून घेऊया.

काय आहे WTF फंड : WTF Funds

निखील कामथ यांनी सुरु केलेला WTF हा फंड तरुणांना आर्थिक मदत करणार आहे. इथे 22 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजाकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन व्यवसायांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या बद्दल बोलताना निखील कामथ म्हणाले कि, फंड सुरु करून ते फॅशन, ब्युटी, घरगुती ब्रँड यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणार आहेत, व या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांसाठी ते मदतीचा हात पुढे करतील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. कंपनीचे युवा संस्थापक आदित्य पालीच्या आणि कैवल्य वोहरा यांना पाहत कामथ यांना हि कल्पना सुचल्याचं ते म्हणाले. या उपक्रमात त्यांना बाकी तीन जणांची मदत होणार आहेत, हे दिग्गज म्हणजे मेनसा ब्रेंडचे संस्थापक अनंत नारायण, हाउस ऑफ एक्स्चेंजचे संस्थापक राज शामानी आणि फ्युचर ग्रुपचे CEO किशोर बियाणी हे WTF फंडच्या दोन विजेत्यांना 40 लाख रुपये देणार आहेत.

म्हणून निखील कामथनी घेतला निर्णय :

फेशन, ब्युटी, घरगुती ब्रँड हि काही अशी क्षेत्रं आहेत जिथे काम करू पाहणाऱ्या उद्योजकांना हवी तशी आर्थिक मदत मिळत नाही. नवीन उद्योजकांना आधार देण्यासाठी म्हणूनच हे दिग्गज एकत्र आले आहे. वरती समाविष्ट असलेल्या क्षेत्रांमधून 22 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या उद्योजकांची ते निवड करणार आहेत व पोस्टकार्डच्या आधारे त्यांना मदत करणार आहेत असे कामथ यांनी म्हंटल. या चर्चेनंतर चारही गुंतवणूकदारांनी 80 लाख रुपयांचा निधी जमा केला ज्यात प्रत्येकाचा 20 लाख रुपयांचा वाटा आहे.