बिझनेसनामा ऑनलाईन । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेले प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) मध्ये बरेच बदल गेल्या काही दिवसांपासून करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलला होता. त्यानंतर ट्विटर्स नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता तुम्ही ट्विटर उघडल्यास तुम्हाला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसेल. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून X आणि ट्विटर चे नाव देखील एक्स ठेवण्यात आले आहे. त्यानंतर X ने बरेच नवीन फिचर यूजर साठी आणले होते. आता तर X वरून जॉब शोधन सुद्धा शक्य होणार आहे.
X लवकरच एक्सहायरिंग नावाचे फीचर लॉन्च करणार आहे. म्हणजे X च्या माध्यमातून आता तुम्ही जॉब (Job) शोधू शकतात. लवकरच ही सुविधा X कडून सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार युजर्स X प्लॅटफॉर्म वरून डायरेक्ट जॉब शोधू शकतील. याबाबत @XDaily ने माहिती दिली आहे. एलन मस्कच्या आर्टिफिशियल इंटेलिजंट कंपनीने AtdateExhiring च्या माध्यमातून पेजवर जॉब लिस्ट पोस्ट करणे सुरू केले आहे. सध्या ही सुविधा फक्त वेब आणि यूएस मध्ये उपलब्ध आहे.
@XDaily ने केलेल्या पोस्टवर एका युजरने लिहिले की, आम्हाला कसं कळेल की आम्हाला जॉब्स कोण देत आहे. यावर जॉब मॅचिंग प्लॅटफॉर्म Lasky चे माजी सीईओ क्रिस बिस्के यांनी उत्तर दिलं की, ‘नोकरी शोधणे यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे की योग्य संधीसाठी मॅच मेकिंग करणे. दोन्हीही लवकरच येत आहे.’ मागच्या महिन्यामध्ये ॲप संशोधक निमा ओवजीने नोकरी लिस्टिंग सुविधेचे डिटेल्स देताना एक स्क्रीनशॉट पोस्ट केला होता. यामध्ये कंपनी देत असलेल्या फॅसिलिटी चे डिस्क्रिप्शन लिहिलेले होते. त्याचबरोबर व्हेरिफाइड ऑर्गनायझेशन सर्विस देखील ट्विटर ने सुरु केली होती. या सर्विस मध्ये प्लॅटफॉर्मवर वेगळेपण दिसण्यासाठी किंवा स्वतःला एक नवीन ओळख देण्यासाठी नवीन टेक्निक असल्याच सांगण्यात आलं होतं.