X Hate Speech : ट्विटर म्हणजेच एक्सचे मालक Elon Musk हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले असतात. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, मात्र याच्याच परिणामी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात हेट कंटेंट आणि स्पॅम होत असल्याचे आरोपही केले जात आहेत. सध्या ट्विटर ही कंपनी एलोन मस्क यांच्या अख्त्यारीखाली येत असून त्यांनी कंपनीचे नाव एक्स (X) असे बदलले आहे. “ट्विटरवर मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या हेट कंटेंट आणि स्पॅमला आळा घालण्यासाठी मी ट्विटर विकत घेतलं” असा दावा एलोन मस्क यांनी केला होता. मात्र आता हेट कंटेंट कंट्रोल करण्यासाठी नेमलेल्या समूहातील तब्बल 1,213 कर्मचाऱ्यांना मस्क यांनी अचानक बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जगभरातील मोठमोठ्याला कंपन्या या गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या आकड्यात कपात करीत आहेत. यात केवळ ट्विटरच नाही तर मायक्रोसॉफ्ट, गुगल यांचाही समावेश होता. मात्र यावेळी इलोन मस्क यांनी अचानक कर्मचाऱ्यांमध्ये एवढी मोठी कपात का केली? हे जाणून घेऊया…
मस्कनी का दाखला कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता? (X Hate Speech)
ट्विटर विकत घेतल्यानंतर केवळ काही महिन्यात एलोन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आतापर्यंत कंपनीमधून हजारो कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाकण्यात आलं आहे. एलोन मस्क हे हेट स्पीच कंट्रोल करण्याच्या उद्देशाने एक्सची जबाबदारी घेण्याचा दावा करतात. मात्र आता हेट स्पीच कंट्रोलिंग टीम मध्येच कंपनीने 1,213 एवढी मोठी कपात केल्याने मस्क आणि कंपनीला याचा विपरीत परिणाम भोगावा लागू शकतो. ऑनलाइन ट्रोलिंग आणि हेट स्पीच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात झाल्यामुळे आता हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी किती सुरक्षित राहिला आहे? (X Hate Speech) असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एलोन मस्क यांच्या याच निर्णयामुळे गेल्या काही महिन्यात एक्स वरील ट्रोलिंग आणि कंटेंट हेट वाढला असल्याचं ऑस्ट्रेलियामधील एका वॉचडॉगने म्हटलं आहे.
चाइल्ड पॉर्नोग्राफीमुळेच एक्सला ठेवला होता दंड:
काही दिवसांपूर्वी चाइल्ड पॉर्नोग्राफी कंटेंट मध्ये वाढ झाल्यामुळे एलोन मस्क त्यांच्या कंपनीला ESaftey Commission कडून दंड ठेवण्यात आला होता. या दंडाची रक्कम 3,88,000 डॉलर्स एवढी मोठी होती मात्र कंपनीने अद्याप हा दंड भरलेलाच नाही. या उलट कंपनीने आदेशा विरोधात न्यायालयाकडे याचिका सादर केली होती. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार सध्या एक्सचे जवळपास 80 टक्के सॉफ्टवेअर इंजिनियर कार्यरत नाहीत आणि यातील कित्येकांना तर स्वतः कंपनीने काढून टाकले आहे.