बिझनेसनामा ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी म्हटले आहे की चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तंत्रज्ञानावर खुले सहकार्य करण्याचे आवाहन याच्यापेक्षा अधिक योग्य वेळी होऊ शकत नाही. चीन आपले कौशल्य, अनुभव आणि नवोपक्रमातील गुंतवणुकीच्या मिश्रणासोबत तंत्रज्ञान शेअर करून जगाला चांगले योगदान देऊ शकेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. सध्या चीनच्या दौऱ्यावर असलेल्या बिल गेट्स यांनी बीजिंगमधील झोंगगुआंकुन फोरमला संबोधित करताना यावर भाष्य केलं.
कोरोना सारख्या साथीच्या रोगापासून अन्न सुरक्षेपासून बाल कल्याणापर्यंतच्या इतर आव्हानांसह समस्या देशातील देशात राहत नाहीत. त्यामुळे त्यांना संबोधित करण्यासाठी आपण सीमा ओलांडून काम करण्यास वचनबद्ध राहिले पाहिजे असेही यावेळी बिल गेट्स यांनी म्हंटल. भविष्यातील महामारी आणि अन्न असुरक्षितता यांसारख्या काही महत्त्वाच्या परंतु तेवढ्याच गुंतागुंतीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी चीन आधीच महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असेही ते पुढे म्हणाले,
दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुद्धा यावेळी बोलताना म्हंटल, राष्ट्रांसाठी सहकार्य वाढवणे आणि तंत्रज्ञान शेअर करणे हे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या पत्रानुसार, चीन विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इतरांशी हातमिळवणी करण्यास तयार आहे.