बिझनेसनामा ऑनलाईन । प्रत्येक कंपन्या ह्या आपले शेअर्सहोल्डर्स वाढावेत यासाठी सतत प्रयत्शील असतात तसेच या स्पर्धेत टॉपला राहण्यासाठी सर्व कंपन्या , बँका विविध योजना आखत असतात .कंपन्यांचे शेअरशोल्डर्स हे कमी किंवा जास्त असे होऊ शकतात पण २०२० मध्ये Yes Bank ची कमी झालेल्या शेअरशोल्डर्स ची संख्या अचानक वाढून तिने आता एक नवीन रेकॉर्ड बनवले आहे .
Yes Bank हि भारतातील खाजगी बँक असून, २००४ साली राणा कपूर व अशोक कपूर या दोघानी मिळून Yes Bank ची स्थापना केली होती. सर्व कंपन्यांपैकी टॉप १० मध्ये हि बँक समाविष्ट झालेली असून आता २०२३ मध्ये ती भारतातील पहिली अशी बँक बनली आहे जीच्या शेयरहोल्डर्सची संख्या हि तब्बल ५० लाखापर्यंत पोहोचली आहे , तिने सर्व कंपन्यांमधून वर येत नवीन रेकॉर्ड बनवले आहे. एस बँकेसाठी हि यशाची गोष्ट ठरली आहे.
पहिल्या क्रमांकाला असणारी बँक –
पहिल्या क्रमांकाला Yes Bank असून Tata Power शेयरहोल्डर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाला असल्याचे दिसून येते त्या पाठोपाठ तिसरा क्रमांक हा Reliance Industries चा लागतो . Yes Bank च्या शेअरहोल्डर्सची संख्या हि ५० लाखा पर्यंत पोहचलेली आहे . दुसऱ्या क्रमांकाला असलेली Tata Power चे शेअरहोल्डर्स ३८. ५ लाख असून, तिसऱ्या नंबरला असलेली Reliance Industries ची शेअरशोल्डर्स संख्या ३३.६ अशी आहे.
Yes Bank ४८.१ वरून ५०.६ वर –
Yes Bank चे शेअर्स हे सार्वजनिक असून डिसेंबर पर्यंत बँकच्या शेअरशोल्डर्सची संख्या हि ४८ . १ होती आणि आता त्यामध्ये वाढ होऊन ५० . ६ लाखापर्यंत पोहचली आहे .
Reserve Bank of India ने बुडण्यापासून वाचवले –
२०२० मध्ये एस बँक बुडायला आली होती अश्या परिस्थिती ऋण ( शेअर्सहोल्डर्स कमी ) झालेल्या बँकेचे नियंत्रण हे Reserve Bank of India आपल्या हाती घेतले व तिला बुडण्यापासून वाचवले होते . त्यानंतर reserve bank ने SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार याना Yes Bank चे MD तसेच CEO म्हणून नियुक्त केले , त्यावेळी Reserve bank नी एक योजना काढली त्यामध्ये २०२३ पर्यंत शेअर्स वरती प्रतिबंध लावण्यात आले होते . १३ मार्च २०२३ मध्ये प्रतिबंध हटवण्यात आले . त्याचाच परिणाम म्हणजे शेअर्स अधिक विकले गेलेले दिसून येतात त्यामुळे हि बँक ५० लाखांचे रेकॉर्ड बनवू शकली आहे व पहिल्या क्रमांकाला पोहचलेली आहे