Yes Bank Shares: तिमाही निकालात मोठे बदल नाहीत; कोटकने ‘Downgrade’ केल्यानंतर येस बँक हादरली !

Yes Bank Shares: आज सकाळीच शेअर बाजारात Yes Bank च्या शेअर्स बद्दल एक विचित्र बाब घडली, अगदी जोरात वाढ होऊन व्यवहार करणारे बँकचे शेअर्स धाडकन खाली येऊन आदळले. बाजारतील तज्ञांच्या मते २०२३च्या डिसेंबर तिमाहीत दाखवलेल्या खिळखिळ्या प्रतिसादामुळे बँकला हा परिणाम भोगावा लागला आहे, आज झालेल्या या खळबळजनक प्रकारानंतर काही ब्रोकरेज कंपन्यांनी तर Yes Bank बद्दल निराशेचा सूर पकडलाय. बाजारात बिघडलेली एकूणच स्थिती पाहता बँक पुन्हा गमावलेलं साम्राज्य परत मिळवणार का, बँकचे शेअर्स पुन्हा जैसे थे होतील का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

कसे आहे बँकचे एकंदरीत चित्र? (Yes Bank Shares)

शनिवारी Yes Bank ने बाजारसमोर डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल प्रस्तुत केला, ज्याच्या आधारे बँकने डिसेंबर महिन्यापर्यंत 231 कोटी रुपायांचा नफा कमावला आहे आणि यात 440 टक्क्यांची वार्षिक वाढ झालेली पाहायला मिळाली. डिसेंबर महिन्याच्या तिमाहीमध्ये तरतूदींच्या घसरणीमुळे बँकेच्या तळपट्टीवर चांगली वाढ झाली. गेल्या वर्षी 845 कोटींच्या तरतूदींवरून यावेळी ती 555 कोटींवर आली आहे, पण कमाईपूर्व नफा मात्र तब्बल 5.4 टक्क्यांनी घसरून 864 कोटींवर पोहोचला. आता ही परिस्थिती कशी समजून घ्याल? तर, एका बाजूला बँकच्या पैशांची तंगी हलकी झाली आणि दुसऱ्या बाजूला कमाई कमी झाली आहे.

बँकेने कमी Provisions मुळे 4 ते 5 पटींनी नफा वाढवला ज्याला आनंदाची बातमी म्हणावी लागेल. परंतु,चालू वर्षाच्या तुलनेत Operation Profit 5 टक्क्यांनी घसरले असल्याने ही चिंताजनक गोष्ट बनते. स्लिपेज म्हणजे कर्जदारांकडून कर्ज मिळणे थांबणे, आणि आत्ताच्या घडीला बँकचा स्लिपेज 2.4 टक्के आहे पण त्याचबरोबर रिटेल लोन पोर्टफोलिओमध्ये स्लिपेज जास्त असल्याने चिंता वाढली आहे, का? तर यामुळे भविष्यात कर्ज वाढी आणि वसूली यावर लक्ष ठेवून येस बँकेला काम करावे लागेल.

यस बँकेच्या या तिमाही निकालानंतर, शेअरची किंमत 25.38 रुपयांवर पोहोचली पण लाभाची बुकिंगच्या प्रवाहाने ती झटपट खाली घसरली(Yes Bank Shares). बँकचा शेअर दिवसाच्या उच्चांकावरून तब्बल 3.45 टक्क्यांवरून घसरत 24.50 रुपयांवर आला तर एकूण बाजारपेढीची किंमत 70,000 कोटी रुपयांच्या पातळीवर खाली आली. बँकेचा शेअर गुरुवारीच्या सत्रात 24.88 रुपयांवर स्थिरावला होता आणि आता या चढ उतारांमुळे बँकेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले आहे.