YouTube वरून पैसे कसे कमवायचे? 1000 Views वर किती रुपये मिळतात?

बिझनेसनामा ऑनलाईन । आज-काल सोशल मीडियाद्वारे YouTube वर बरेच रिल्स व्हिडिओ शेअर केले जातात. जगातील काही आश्चर्य, फिरण्यासाठीचे काही ठिकाण, रेसिपी या सर्वांची माहिती YouTube च्या माध्यमातून आपल्याला मिळते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? You Tube च्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. त्यामुळे सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या या जगात तुम्ही पैसे कमवण्यासाठी YouTube चा वापर करू शकता. त्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

युट्युब वर (YouTube) आपण व्हिडिओ किंवा कंटेंट टाकल्यास कंपनीकडून व्हिडिओ आणि कन्टेन्ट क्रियेटर्सला त्यांची कंटेन्ट क्वालिटी कॅटेगिरी आणि येणाऱ्या व्ह्यूजवर पैसे मिळत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स विभागाने एका युट्युबरच्या घरी छापा टाकला होता. यावेळी त्याच्याकडून 24 लाख रुपये कॅश मिळाले. त्याचबरोबर या युट्युबर तसलीम खान वर आरोप करण्यात आले आहे की, त्यांनी चुकीच्या पद्धतीने करोडो रुपये कमावले आहेत. त्याचबरोबर हा युट्युबर ट्रेनिंग हब 3.0 या नावाने चैनल चालवत होता. यावरून प्रश्न निर्माण होतो की युट्युबरची कमाई किती प्रमाणात असेल.

युट्युब वर व्हिडिओ बनवणाऱ्यांचा कन्टेन्ट चांगला असेल आणि या कंटेन्ट वर जास्त व्ह्यू आल्यास युट्युबवर जाहिराती सुरू होतात. या जाहिरातींच्या माध्यमातून 55% पर्यंत पैसे कमवता येऊ शकतात. यासाठी युट्युब युजर्स Youtube Partner Program चे हिस्सा असणे गरजेचे आहे. या प्रोग्रामला क्वालिफाईड करण्यासाठी युट्युब युजर च्या चैनल ला 500 सबस्क्राईब आणि 3000 तास वॉच ओवर टाईम असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर युट्युब वर असलेल्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली जाते.

1000 व्ह्यूज वर किती रुपये मिळतात? (YouTube)

2022 च्या डेटानुसार, अमेरिकेत युट्युबर्सची कमाई महिन्याला 4600 डॉलर म्हणजेच 3,77,234 रुपये एवढी होती. युट्युबरर्स ला सरासरी 1000 व्ह्यूज वर 18 डॉलर म्हणजे 1558 रुपयांपर्यंत कमाई मिळते. युट्युब च्या माध्यमातून शॉर्ट व्हिडिओ बनवून देखील पैसे कमावता येतात. युट्युबवर व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सला कंटेट नॉलेज सह त्याच्या डोक्यात नवीन नवीन आयडिया असणे आवश्यक आहे. त्याच्या माध्यमातून तो पैसे कमवू शकतो.