YouTube Shorts: 60 सेकंदांचा Video करवून देईल कमाई; घरबसल्या मिळवाल हजारो रुपये

YouTube Shorts: आजच्या या महागाईच्या जमान्यात आपण नक्कीच पैसे कमावण्याच्या उपयुक्त साधनांच्या शोधात असतो आणि जर का हे काम घर बसल्या करता येणार असेल तर यापेक्षा मोठं सुख नाही, खरं की नाही? Technology चा वापर तर एवढा वाढतोय की एखाद्या माणसाला जर का ही Technology व्यवस्थित हाताळता आली तर घर बसल्या भली मोठी रकम कमावणे शक्य आहे. YouTube च्या साहाय्याने तर कित्येक लोकं घरच्याघरीच भरगोस पैसे कमावतात, आपल्यापैकी सुद्धा अनेक जणं असे Videos बघून दैनंदिन प्रश्न सोडवत असू, थोडक्यात काय तर आजकाल लोकांना हरेक प्रश्नाचे उत्तर जास्ती वेळ न दवडता मिळालं पाहिजे आणि यासाठी ते कितीही पैसे मोजायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. तुम्ही जर का लोकांचे प्रश्न जाणून ते सोडवायला शिकलात तर तुमचा हात कोणीही धरू शकत नाही.

YouTube वरून कसे पैसे कमवाल?

YouTube हा जगातील सर्वात लोकप्रिय Video Sharing Platform आहे. अनेकांना असे वाटते की YouTube वर यशस्वी होण्यासाठी महागडी उपकरणं आणि संपादन कौशल्य आवश्यक आहे. मात्र, हे खरं नाही! तुम्ही अगदी छोटे Video बनवूनही YouTube वरून पैसे कमवू शकता. YouTube Short ही अशी सुविधा आहे जी तुम्हाला 60 सेकंदांपर्यंत लहान Video Upload करण्याची सुविधा देते. हे Videos पूर्णपणे मोबाइलवरून बनवले आणि संपादित केले जाऊ शकतात, ज्यामुळे ते नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय बनतात.

YouTube Shorts बनवण्याच्या नियम व अटी:

YouTube Video बनवण्यासाठी काही नियम व अटींचे पालन करावे लागते. एकतर जर का तुमचे Subscribers 1,000 किंवा त्याहून अधिक असतील तरच तुमच्या कामाचे पैसे YouTube कडून दिले जातील. तुम्ही जो काही Content लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत तो खरा असावा, लोकं YouTubeला मार्गदर्शक मानतात त्यामुळे चुकीची माहिती पसरवणं बरोबर नाही हे लक्ष्यात असुद्या. शिवाय सध्या Ai चा वापर बऱ्यापैकी वाढतोय, जिथे एखादा प्रश्न टाकून तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता मात्र अशी चोरलेली किंवा उचलली माहिती YouTube खपवून घेणार नाही, तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर मेहनत करावीच लागेल.

सर्वात शेवटी पण महत्वाचा नियम सांगतो की YouTube ने अलीकडेच त्यांच्या Channel Monetization धोरणात बदल केले आहेत(YouTube Shorts). या नवीन निकषांनुसार, Channel Monetization साठी अर्ज करण्यापूर्वी 90 दिवसांच्या काळात 10 दशलक्ष Views किंवा गेल्या 12 महिन्यांमध्ये 4,000 तासांचा Watch Time पूर्ण करणे आवश्यक आहे.