Zee Company: जी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेज लिमिटेडच्या(Zee Entertainment Enterprises Limited) खात्यातून 24 कोटी डॉलर गायब झाल्याची बातमी समोर आल्यामुळे खळबळ उडाली. SEBI ने केलेल्या चौकशीतून ही गडबड उघडकीस आली आहे आणि म्हणूनच आता SEBI ने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. सोनीसोबतचा विलीनीकरण करार रद्द झाल्यानंतर ZEE आधीच अडचणीत होती. आता या नवीन समस्येमुळे कंपनीची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आता SEBIच्या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि या प्रकरणाचा कंपनीच्या भविष्यावर काय परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे.
सदर समस्येवर कंपनीचे म्हणणे काय? (Zee Company)
ZEE चे प्रवक्ते म्हणाले की कंपनी SEBI ला सर्व माहिती देण्याच्या प्रक्रियेत आहे. सुभाष चंद्रा आणि पुनीत गोयनका यांच्यावरील SEBIच्या चौकशीमुळे सोनी आणि ZEE यांच्यातील करार पुढे जाऊ शकला नाही. दोन्ही कंपन्यांमध्ये 2021 मध्ये करार झाला होता. त्यानुसार गोयनका यांना विलीनीकरणानंतर बनणाऱ्या कंपनीचे CEO बनवले जाणार होते. परंतु SEBIच्या चौकशीमुळे सोनी या कराराशी सहमत झाली नाही. शेवटी, जानेवारीमध्ये त्यांनी हा करार रद्द केला.
मात्र या मंगळवारी अशी बातमी आली की पुन्हा एकदा सोनीसोबत कराराची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवार सकाळी 10.30 वाजता, ZEE कंपनीचा शेअर 10.52 टक्क्यांनी घसरून 172.70 रुपयांवर पोहोचला(Zee Company). लक्ष्यात घ्या मंगळवारी तो 193 वर बंद झाला होता आणि आजच्या दिवसाच्या व्यापारात तो 165.55 रुपयांपर्यंत घसरला आहे.