Zee-Sony Deal Break : झी आणि सोनीचा करार मोडल्याने अंबानी होणार मालामाल; एकूण गणित आहे तरी काय?

Zee-Sony Deal Break: मनोरंजन क्षेत्रातल्या दोन मोठ्या कंपन्या म्हणजेच Zee आणि Sony, यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र कालच समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांची मतं जुळत नसल्यामुळे हा करार रद्द झाला आहे. बाजारी तज्ञांच्या मते बाजारातील या दोन मोठ्याला कंपन्या एकत्र आल्या असत्या तर मनोरंजन क्षेत्रात भला मोठा व्यवहार उभा पाहू शकला असता, मात्र आता हा करार तुटल्यामुळे दोन्ही कंपन्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी तयार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे का हा करार तुटल्याचा आपल्या देशातील एका उद्योगपतीला सर्वात मोठा फायदा होणार आहे, देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणजेच मुकेश अंबानी यांना संपूर्ण प्रकरणाचा भाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. Sony आणि Zee आता एकत्र येणार नसल्यामुळेच मुकेश अंबानी यांच्या Viacom18 समोरचं सर्वात मोठा आव्हान बाजूला झालंय.

Sony आणि Zeeचा करार तुटल्याने अंबानी खुश? (Zee-Sony Deal Break)

Sony आणि Zee ह्या दोन मोठाल्या कंपन्यांचा एकमेकांसोबतचा करार तुटल्याने अनेक अडचणींचा सामना करीत आहेत, मात्र या परिस्थितीत आपल्या देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणजेच मुकेश अंबानी मात्र खुश असण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल की सोनी पिक्चर या सर्वात जुन्या खासगी मीडिया हाऊसकडून झी या कंपनीचा भार स्वीकारला जाणार होता मात्र हा करार पूर्ण न झाल्याने सगळीच घडी विस्कटली.

उद्योगपती मुकेश अंबानी हे देशात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात. त्यापैकी मनोरंजन क्षेत्रातील Viacom18 ही त्यांच्या मालकीची कंपनी आहे. अलीकडे त्यांनी व्यवसायाच्या विस्तार करण्यासाठी स्टार नेटवर्क विकत घेण्यासाठी Disny सोबत एक करार केला होता ज्या करारानंतर अंबानीच्या मालकीत स्टार नेटवर्कचे सर्व चॅनल आणि Disny+Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे मालकी हक्क सामावले जातील. अश्या परिस्थितीत जर का Sony आणि Zee यांच्यातील करार पक्का झाला असता तर मात्र अंबानींना जबरदस्त स्पर्धक मिळाले असते. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकल्या असत्या तसेच त्यांना जाहिरात विश्वास देखील मोठा वाटा मिळाला असता.

मुकेश अंबानी आणि Disney यांची हात मिळवणी:

सध्या मुकेश अंबानी Disney सोबत करार पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. हा करार जर का यशस्वीरित्या पूर्ण झाला तर एकूण 115 टीव्ही चॅनेल्स आणि दोन OTT platforms मुकेश अंबानी यांच्या मालकीचे होतील. सध्या स्टार इंडियाकडे 77 चॅनल्स आहेत तर Viacom18 कडे 38 चॅनल्स आहेत, त्यामुळे हा करार जर पार पडला तर उत्तर भारतातील शहरांमधल्या हिंदी चॅनल्सचा एक तृतीयांश भाग आणि दक्षिण भारतातील तमिळ मनोरंजन क्षेत्रातील एक चतुर्थांश भाग मुकेश अंबानी यांना मिळेल, एवढंच नाही या करारामुळे मुकेश अंबानी जाहिरातीच्या बाजारपेठेत देखील चांगली कमाई करतील (Zee-Sony Deal Break). लवकरच देशात IPL या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या रणसंग्रामाची सुरुवात होत असल्याने एकूणच आता मुकेश अंबानी यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.