Zee Sony Deal : Sonyचा ‘बॅकआऊट’, Zee कायदेशीर ‘बॅटल’ ला तयार! 

Zee Sony Deal : Zee आणि Sony या दोन्ही कंपन्यांमध्ये होणारा करार पूर्ण होणार नाही, या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या असत्या तर नक्कीच मनोरंजन क्षेत्राला कधीकधीक फायदा झाला असता. दोन्ही कंपन्यांचे एकमेकांसोबत मत जुळत नसल्यामुळे हा मोठा करार आता कायमचा तुटलाय. दोन्ही कंपन्यांची मतं वेगळी होती, काही अटींबद्दल मतं जुळत नव्हती. एवढंच नाही तर Sony आता झी कडून टर्मिनेशन फी(Termination Fee) मागत आहे. आत्ताच्या घडीला या दोन्ही कंपन्या एकमेकांना करार तुटण्यासाठी जबाबदार ठरवत असून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे वाद सुरु झालेत. या संपूर्ण विस्कटलेल्या परिस्थितीत आता कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देईल हे पाहणं आकर्षकी ठरणार आहे.

झी आणि सोनीचा करार मोडला : (Zee Sony Deal)

Culver Max Entertainment (CME)ने आज झी या कंपनीला नोटीस पाठून दोघांमधला करार संपला असल्याची माहहती कळवली. 22 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या या करारानुसार झी कंपनीचे Culver Max Entertainment (CME) मध्ये विलीनीकरण झाले असते, मात्र 21 जानेवारी रोजी झालेल्या अंतिम मुदत वाढीवर दोघांचे एकमत झाले नाही. दोन्ही बाजूनी मनासारख्या अटी मान्य न झाल्यामुळेच हा करार आता संपुष्टात आलाय. Culver Max Entertainment (CME)ने माध्यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना हा करार तुटल्याचे दुःख आहे, गेल्या दोन वर्षांपासून या सर्व गोष्टींवर चर्चा सुरु होती, मात्र अंतिम टप्प्यात सारा खेळच फिस्कटला. पुढे बोलत असताना कंपनी असंही म्हणाली की, बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कायम तत्पर असतील, तसेच रसिक प्रेक्षकांना उत्तमोत्तम कार्यक्रमांची भेट देणं हे कंपनीचं काम आहे आणि ही जबाबदारी ते न चुकता बजावतील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

करार फिस्कटल्यावर काय म्हणाले पुनीत गोएंका ?

संपूर्ण घटनेमुळे झी कंपनी सध्या संकटांचा सामना करत आहे, तरीही कंपनीचे संचालक मंडळ आवश्यक ती सर्व काळजी घेत असून त्यांच्याकडून वेळ पडल्यास कायदेशीर मदत देखील घेतली जाऊ शकते. सर्वांचे दीर्घकालीन हित जपण्यासाठी कंपनी काही विशेष निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. सगळ्या चर्चा करूनही, ZEE आणि कल्वर मॅक्स, BEPL यांच्यात करारातील गरजेच्या गोष्टींवर एकमत होऊ शकले नाही, यामुळे इथे अडचण निर्माण झाली(Zee Sony Deal). ZEE चे MD आणि CEO पुनीत गोएंका हे या एकत्रीकरणासाठी त्यांच्या पदावरून पायउतार होण्यासही तयार होते. या संदर्भात चर्चा देखील झाली होती. त्यानंतर झी आणि सोनी यांच्यातील एकत्रीकरणाचा करार पूर्ण करण्यासाठी झी कंपनीने आणखी 6 महिने वाढ मुदतवाढ मागितली होती पण, Sony ने त्यांच्या प्रस्तावाची दखलही घेतली नाही आणि हा करारच रद्द केला.