ZEE-Sony Deal: Sony Group Corporation ने आज बोर्डची बैठक बोलालवलेली असून, सादर बैठकीत कंपनीचे पदाधिकारी Zee Enterprises सोबत होणाऱ्या 100 हजार कोटींच्या विलीनीकरणावर चर्चा करणार आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार ही कंपनीकडून कडून घेतली जाणारी अंतिम बैठक असेल, या बैठकीनंतर Zee कंपनीचे MD आणि कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका आपला शेवटचा आणि निर्णायक शब्द ठेवतील, त्यांनी जर का हा करार अमान्य केला तर मात्र Sony आणि Zee या दोन्ही कंपन्यांची हातमिळवणी अश्यक आहे.
Sony आणि Zee एकत्र येणार का? (ZEE-Sony Deal)
गुरुवारी जाहीर झालेला एक वृत्तपत्राच्या माहितीनुसार Culver Max Entertainment Private Limited (आधीची Sony Pictures Networks India Private Limited) आणि ZEE यांनी विलीनीकरण पूर्ण करण्यासाठी चर्चा केली होती आणि यावेळी पुनीत गोयंकानी यांनी नव्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शविली होती. आजच्या बैठकीनंतर जर का हे विलीनीकरण यशस्वी झालं तर येणाऱ्या काळात Sony आणि Zee एकत्र येऊन, Netflix आणि Amazonच्या जोडीला जबरदस्त टक्कर देऊ शकतील. लक्ष्यात घ्या कि जागतिक पातळीवर Netflix आणि Amazon चा हात मागे खेचणारी आणखीन कोणतीही कंपनी नाही. एवढेच नव्हे तर या एकत्रीकरणामुळे देशांर्गत सर्वात दिगज्ज मानल्या जाणाऱ्या रिलायन्स कंपनीशी स्पर्धा करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांना पुरेसे आर्थिक बळ मिळणार आहे.
मात्र आता जर का 20 जानेवारी पर्यंत हे विलीनीकरण झाले नाही, तर ZEE कंपनी Culver Max Entertainment Private Limited यांच्याविरोधात नुकसान भरपाईचा दावा करू शकते. कारण हा करार व्हावा म्हणून CCI कडून ZEE कंपनीसमोर काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, आणि विलीनीकरणाच्या अटींचे पालन करण्यासाठी Zee ला काही आकर्षक उपक्रम बंद करण्यास भाग पाडले होते. म्हणूनच आता या टप्प्यावर जर विलीनीकरण झाले नाही तर Zee कंपनीचे मोठे नुकसान होण्याची शक्याता आहे.
ZEE ची पार्शवभूमी कशी आहे?
भारताच्या प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने म्हणजेच (The Securities and Exchange Board of India) ने गेल्या जून महिन्यात कंपनीचे संस्थापक सुभाष चंद्रा यांनी खासगी गुंतवणुकीच्या करारांची भरपाई दाखवण्यासाठी कर्ज वसुलीचे बनावटी चित्र उभे केल्याचा आरोप लावला होता, आणि पुढे SEBI च्या आदेशानुसार चंद्रा आणि त्यांच्या मुलाने गैरमार्गाने रक्कम वळवली असल्याने त्यांना यापुढे कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये कार्यकारी किंवा संचालकपद दिले जाणार नाही असा निर्णय जाहीर करण्यात आला होता, मात्र पुढे गोयंकाला SEBI च्या आदेशावर स्थगिती मिळाली.
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख मीडिया कंपनी आहे. ती अनेक टीव्ही चॅनेल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि चित्रपट निर्मितीचे स्टुडिओ चालवते. गोयंका कुटुंब देखील अनेक व्यवसायांमध्ये गुंतलेले आहे. वर्ष 2021 मध्ये झालेल्या करारानुसार सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एकत्रीकरणानंतरच्या कंपनीतील 50.86% हिस्सा घेणार होते आणि गोयंक कुटुंब 3.99% मालकी मिळणार होती यामुळे सोनीला भारतातील मीडिया बाजारात आणखी मजबूत स्थान मिळवण्यास मदत मिळू शकली असती, तसेच सोनीला भारतातील टीव्ही चॅनेल्सची श्रेणी वाढवता आली असती.