Zen Technologies Stock: एका वर्षात दिला 220 टक्क्यांचा परतावा; आता सौरक्षण मंत्रालयाकडून मिळाली मोठी ऑर्डर

Zen Technologies Stock: झेन टेक्नोलॉजी नावाची एक लहान कंपनी आहे जी एरोस्पेस(Aerospace) आणि डिफेन्स क्षेत्रात(Defense) काम करते. या कंपनीने एका वर्षात मोठा परतावा दिल्यानंतर तिला संरक्षण मंत्रालयाकडून आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला याबद्दल माहिती दिली आणि या ऑर्डरमुळे कंपनीचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा शेअरधारकांनाही मिळेल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

झेन टेकनॉलॉजिएसला मिळाली मोठी ऑर्डर: (Zen Technologies Stock)

या कंपनीचे शेअर्स सध्या 810 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने 220 टक्के मल्टीबैगर रिटर्न दिले आहे. उदाहरण देऊन याचा अर्थ समजवायचा झाल्यास, ज्यांनी एक वर्षापूर्वी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांचे पैसे आता 3.20 लाख रुपये झाले आहेत.

सदर कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 93 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाली असून यात GST समाविष्ट होतो. 27 जानेवारीला कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, ज्यात कंपनीने सांगितले की 31 डिसेंबर 2023 पर्यंत तिची एकूण ऑर्डर बुक 1435 कोटी रुपयांच्या जवळपास गेले आहे. Q3 मध्ये कंपनीला एकूण 129 कोटी रुपयांचा नवीन ऑर्डर मिळाल्या असून त्यांनी 98 कोटी रुपयांची ऑर्डर पूर्ण केला गेला.

झेन टेकनॉलॉजिएस बद्दल थोडक्यात:

झेन टेक्नोलॉजी ही भारतातील एक अग्रगण्य ड्रोन विरोधी प्रणाली (Anti-Drone System) आणि संरक्षण उपाय (Defense Solution) पुरवणारा उद्योग आहे. सध्या, या कंपनीचे शेअर्स 810 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. मागील एका आठवड्यात, या स्टॉकमध्ये 2 टक्क्यांची आणि दोन आठवड्यांत 3 टक्क्यांची घसरण झाली(Zen Technologies Stock). तरीही, एका महिन्याच्या आधारावर, झेन टेक्नोलॉजीने 8 टक्क्यांचा परतावा दिला आहे