Zerodha Mutual Fund लवकरच बाजारात येणार; SEBI ची मंजुरी

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठी ब्रोकिंग कंपनी जेरोधा आता म्युच्युअल फंड (Zerodha Mutual Fund) व्यवसायात उतरणार असून या कामासाठी कंपनीला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून आवश्यक मंजुरी मिळाली आहे. लवकरच कंपनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी AMC बिझनेस लॉन्च करणार आहे. याबद्दल कंपनीचे CEO नितीन कामत यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. या बिझनेससाठी जेरोधा ने स्मॉलकेस नावाच्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली असून विशाल जैन या व्यवसायाचे नवे CEO असतील.

काय म्हणाले जेरोधाचे फाउंडर? (Zerodha Mutual Fund)

म्युच्युअल फंड बिझनेस सुरू करण्यासाठी दोन मोठे कारणे होती. पहिलं म्हणजे भारतीय बाजारासाठी सर्वात मोठे आव्हान आणि दुसरी सर्वात मोठी शक्यता म्हणजेच गुंतवणूकदारांची कमी संख्या. या सोबतच नितीन कामत म्हणाले की, मागच्या तीन वर्षांमध्ये शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असं असताना देखील आता 6- 8 करोड युनिक म्युच्युअल फंड आणि इक्विटी इन्व्हेस्टर्स आहेत. जर आपल्याला दुसऱ्या मोठ्या चॅलेंज बद्दल बोलायचं झालं तर एक करोड नवीन गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केट सोबत जोडावे लागेल. यासाठी आपल्याला सिम्पल प्रोजेक्ट ठेवावे लागतील. म्हणजेच या प्रोजेक्ट बद्दल आपण त्यांना सोप्या पद्धतीने समजावू शकतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि चांगली पद्धत म्हणजे म्युच्युअल फंड (Zerodha Mutual Fund) हे आहे.

नवीन बिजनेससाठी केली ‘या’ व्यक्तीची नियुक्ती

नितीन कामत यांनी जेरोधाच्या नवीन बिजनेस साठी म्हणजेच AMC साठी सीईओ म्हणून विशाल जैन यांची नियुक्ती केली आहे. यासोबतच कंपनी लवकरच एनएफओ ची देखील घोषणा करणार आहे. जेरोधा कंपनीने म्युच्युअल फंड बिझनेस (Zerodha Mutual Fund) सुरू करण्यासाठी फेब्रुवारी 2020 मध्ये आवेदन दिले होते. याच बिझनेससाठीच नाही तर जेरोधा कंपनीला हेलीयोस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला देखील सेबीने हेलीयोज म्युच्युअल फंड साठी मंजुरी दिली होती.