Zomato Extra Charges : झोमॅटोवर ऑर्डर करणं महागणार; कंपनीने लावले ‘इतके’ चार्जेस

बिझनेसनामा ऑनलाईन (Zomato Extra Charges) । फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या झोमॅटो वरून बरेच जण जेवण ऑर्डर करत असतात. बऱ्याचदा काही पार्टीसाठी मित्र-मैत्रिणी देखील झोमॅटो या ॲपचा वापर करून हवे असलेले पदार्थ मागवतात. परंतु आता झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवणं खूप कठीण होणार आहे. वाढत्या महागाईचा फटका आजकाल प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे. हाच फटका आता झोमॅटो आपला ग्राहकांना देणार आहे. झोमॅटो ची प्रतिस्पर्धी स्विगीने एप्रिल महिन्यापासून शुल्क आकारणी करणे सुरू केले होते. त्याचप्रमाणे आता झोमॅटोने देखील शुल्क आकारणी सुरू (Zomato Extra Charges) केली आहे.

झोमॅटो वर प्रत्येक ऑर्डर वर ग्राहकांना आता २ रुपये शुल्क द्यावे लागणार असून ऑर्डरच्या किमती मध्ये काहीच परिणाम पडणार नाही. फक्त ऑर्डर केल्यावर एक्स्ट्रा चे दोन रुपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर झोमॅटो गोल्ड वर सुद्धा गुंतवणूकदारांना आता शुल्क भरावे लागणार आहे. सध्या याबाबत प्रयोग सुरू असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास झोमॅटो कंपनीला मोठा नफा होऊ शकतो. परंतु यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.

Zomato दर महिन्याला 12 कोटी रुपये अतिरिक्त कमावणार– (Zomato Extra Charges)

जूनमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत झोमॅटोला 176 दशलक्ष ऑर्डर्स मिळाल्या. जर या ऑर्डर्सचा रोजचा हिशोब केल्यास कंपनीला दररोज सुमारे 20 लाख ऑर्डर्स मिळतात. त्यानुसार, इथून पुढे प्रत्येक ऑर्डर वर २ रुपये आकारले तर कंपनी दररोज 40 लाख रुपये कमवू शकते. आणि दर महिन्याचा हिशोब काढला तर महिन्याला यामुळे झोमॅटोला 12 कोटी रुपये अतिरिक्त फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शेअर बाजार मध्ये झोमॅटो कंपनीचा शेअर हा बीएसई वर 155% एवढा होता. तो 1.32 रुपयांनी वाढला असून 86.22 वर बंद झाला होता. जून 2030 मध्ये क्विक कॉमर्स मध्ये झोमॅटो कंपनीने सकारात्मक योगदान दिले. झोमॅटो कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये बाजारात आला होता. त्यावेळी या आयपीओ ची इशू प्राईज ही 76 रुपये होती. कंपनीचा उच्चांक 163 रुपये एवढा असून सध्या या शेअरमध्ये तेजी दिसत असली तरी हा शेअर त्याच्या उच्चांकी कामगिरीपेक्षा 47 टक्के घसरणीवर आहे.