Zomato : घरी जेवण मागून जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही! स्वयंपाक घरात त्याच मसाल्यांनी आणि त्याच भाज्यांनी आपण कंटाळून जातो आणि मग काहीतरी वेगळं खाण्याची रूच येते, बरं कामाचा व्याप एवढा असतो कि कुठे बाहेर जाऊन जेवायचं म्हटलं तरीही शक्य होत नाही. अश्यावेळी Swiggy आणि Zomato यांचा भरपूर फायदा होतो. आज Zomato कंपनीकडून एक विशेष बातमी समोर आली आहे. हि बातमी नवीन लोकांच्या निवडीबाबत आहे.
Zomato मध्ये नवीन लोकांना जागा नाही:
Zomato कंपनीचे CEO दिपिंद्र गोयल यांनी कंपनीच्या हायरिंग प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले कि कंपनी कामाच्या शोधात असलेल्या कर्मचाऱ्यांची निवड करत नाही. कर्मचारी निवडण्याची त्यांची प्रक्रिया इतर कंपन्यांपेक्षा फार वेगळी आहे. ज्यांच्या शोधात कंपनी आहे अशी लोकं कधीच नोकरी शोधताना दिसत नाहीत असं ते म्हणाले.
कंपनी कोणत्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे?
Zomato या कंपनीची सुरुवात वर्ष 2010 मध्ये झाली होती आणि त्यानंतर कंपनीने अनेक हॉटेल्स आणि रेस्टोरंट सोबत काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे घरपोच डिलिवरी करण्यामध्ये ते असे हॉटेल्स आणि ग्राहक यांना सोबत जोडण्याचं काम करतात. त्यामुळे अश्या कामांसाठी साजेश्या लोकांच्या कंपनी कायम असते.
तरुणांना नोकरी देण्याबाबत ते जास्ती सकारात्मक वाटत नाही, कारण कंपनी पंधरा वर्षांपासून बाजारात काम करत आहे आणि त्यांच्याजवळ कामाचा अनुभव असणारे कर्मचारी आहेत. कंपनी जर का नवीनच असती तर नवख्या लोकांना काम देण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता पण परिस्थिती वेगळी असल्यामुळे सध्यातरी त्यांचा असा काही विचार नाही. नवीन लोकांना कामावर रुजू करणे हि वेळ खाऊ प्रक्रिया आहे आणि व्यवसायाचे काम पाहता एवढा वेळ जाऊ देणं परवडणारं नाही