बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने आज शुक्रवारच्या शेअर मार्केट व्यवहारात मोठी झेप घेतली आहे. झोमॅटोच्या शेअर्समध्ये तब्बल ८ टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली असून शेअर्सची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोचली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झालेला पाहायला मिळत आहे.
झोमॅटो आणि स्विगी या अन्न वितरण करणाऱ्या कंपन्याच्या प्लॅटफॉर्मला पूर्वी मान्यता नव्हती. त्यांना थर्ड पार्टी अँप म्हंटल्या जात होतं. असं असताना आता झोमॅटोच्या शेअर्स मध्ये आज वाढ बघायला भेटली. या शेअर्स ची किंमत सुमारे 8 टक्क्यांनी वाढून ₹73.20 वर पोहोचली आहे. काही महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर मध्ये झोमॅटो च्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 75.55 रुपये आणि नीचांक 40.55 रुपये एवढा होता.
जेव्हा ONDC ने नेटवर्क शेअर्ससाठी आपल्या प्रोत्साहन योजनेत सुधारणा केल्याचं सांगितले त्यानंतर, झोमॅटो या ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्स मध्ये वाढ झाली.ONDC हे सरकार समर्थित प्लॅटफॉर्म आहे जे एकमेकांशी जोडलेल्या ई- मार्केटप्लेसचे नेटवर्क म्हणून काम करते. ONDC रेस्टॉरंट्सना थर्ड पार्टीअँप द्वारे म्हणजे Zomato आणि Swiggy यासारख्या अँप शिवाय अन्न विकण्याची परवानगी देते. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने डिजिटल इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 2021 मध्ये ONDC लाँच केले होते.